वाईचे उपनगराध्यक्ष, युवा बांधकाम उद्योजक अनिल सावंत यांच्या साक्षी नाईन ब्लॉसम डेव्हलपर्सच्या “साक्षी विश्व’ या भव्य दिव्य गृहप्रकल्पाचा शुभारंभ राज्याचे सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील, वाईचे आमदार मकरंद (आबा) पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रविवारी दि. 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता होत आहे. त्यानिमित्त या प्रकल्पाविषयी थोडक्यात…
वाई- सुरुर रस्त्यावर तीनशेहून अधिक फ्लॅटचा “साक्षी विश्व’ हा महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्प साकारला जात आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक वारसा जपणाऱ्या, तालुक्याचं ठिकाण असलेल्या आणि कृष्णामाईच्या काठावर वसलेल्या दक्षिण काशी, विराटनगरी वाईपासून अवघ्या सात किलोमीटरवर निसर्गरम्य परिसरात या प्रकल्पाची निर्मिती होत आहे. या प्रकल्पाचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे डी- मार्ट पासून हा प्रकल्प हाकेच्या अंतरावर आहे.
शिवाय येथून जवळच प्रसिद्ध मॅप्रो गार्डन आहे. ज्या निसर्गरम्य केंजळ गावच्या हद्दीत हा प्रकल्प उभारला जात आहे ते गाव पुणे- बंगळुरू महामार्गापासून अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. पाचगणी आणि महाबळेश्वर या पर्यटनस्थळांना जाणाऱ्या हमरस्त्यावर हा प्रकल्प साकारत आहे. रोहिडेश्वराच्या साक्षीने ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली तो रायरेश्वर किल्ला, महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष असलेला प्रतापगड हे ही सारं काही येथून जवळच आहे. चित्रपटसृष्टीला मोहून टाकणारं धोम धरण येथून केवळ 16 किलोमीटरवर! खरंतर थेट कोकणाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर या प्रकल्पाची निर्मिती होत आहे. “वर्क फ्रॉम होम’च्या काळात निसर्गाचे अनोखे वरदान
विश्वासार्हता असल्यानेच गुंतवणूक
वाईत 2013 मध्ये साकारलेल्या साक्षी डेव्हलपर्स यांच्या “साक्षी हाईट्स’ या गृह प्रकल्पातील सर्वच्या सर्व 105 फ्लॅटचे बुकिंग भूमिपूजनाच्या दिवशीच झाले होते. बांधकाम क्षेत्रात हा नवा विक्रम ठरला होता. विश्वासाहर्ता जपल्यानेच साक्षी डेव्हलपर्सच्या नवीन प्रकल्पात लोक पुन्हा पुन्हा गुंतवणूक करत असल्याची माहिती अनिल सावंत यांनी दिली.
लाभलेल्या परिसरात राहून कामाच्या व्यापातसुद्धा मनाचा टवटवीतपणा कायम टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने या गृहप्रकल्पात नैसर्गिक वातावरण आणि आधुनिकता यांचा सुरेख मिलाफ करण्यात आलेला आहे. मोठमोठ्या शहरात असणाऱ्या आधुनिक सोयीसुविधा येथे उपलब्ध असणार आहेत. पुण्यापासून अवघ्या दीड तासांच्या अंतरावर आणि मुंबईपासून चार तासांच्या अंतरावर असणारा हा प्रकल्प सेकंड होमसाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.
सध्याच्या संकटकाळात शहरातून आपल्या गावी कायमचे वास्तव्यासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी येथे विशेष सवलती देण्यात येत आहेत. येथे फ्लॅट घेणारावर स्टॅंप ड्युटी, एमएसईबी व इतर डेव्हलपमेंट चार्जेस, जीएसटी आदींचा कसलाच भार पडणार नाही. शिवाय प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून सुमारे 2.5 लाख रुपयांचा लाभ मिळवून देण्याचाही प्रयत्न आहे, असे अनिल सावंत यांनी आवर्जून सांगितले. सर्वच बॅंकांनी कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली असल्याने येथे अल्पदरात मनपसंत व हक्काचे घर घेण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळणार आहे.
“साक्षी विश्व’ या गृहप्रकल्पात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बुकिंग करणाऱ्या पहिल्या 51 ग्राहकांना विशेष सूट देण्यात येणार आहे. वाई, पाचगणी, महाबळेश्वर या पर्यटनस्थळांना भेटीला येणाऱ्या पर्यटकांना भुरळ पडावी अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या या गृहप्रकल्पात मनपसंत दरात आपलं हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. बांधकाम व्यवसायात वेगळी विश्वासार्हता असणाऱ्या साक्षी समूह डेव्हलपर्सच्या माध्यमातून उभारलं जाणारं “साक्षी विश्व’ वाईच्या नावलौकिकात नव्यानं भर घालणारं ठरणार आहे.
प्रशस्त अंतर्गत रस्ते, आल्हाददायक पार्टी लॉन, मोफत पार्किंग, मुलांसाठी खेळाचे मैदान, लिफ्टची सुविधा आणि ज्येष्ठांसाठी स्वतंत्र बैठक कट्टा असं सारं सारं या नव्या विश्वात असल्याने या गृहप्रकल्पात आपलंही हक्काचं घर असावं असंच प्रत्येकाला वाटणार आहे. यासाठी एकदा अवश्य या आणि गृहप्रकल्पाच्या साईटला नक्की भेट द्या. “दसरा सण मोठा, साक्षी विश्वमध्ये मनपसंत दरात हक्काचं घर घेण्याचा आनंद लुटा…’
शब्दांकन : अनिल काटे