वाई – ग्राहकांचे समाधान हेच आमचे श्रद्धास्थान हे ब्रीदवाक्य घेवून विक्री पश्चात विश्वासाची हमी सेवा देवून वाई तालुक्यासह सातारा, खंडाळा, कोरेगाव, जावली, महाबळेश्वर तालुक्यातील असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या वाई शहरातील एकमेव मोझर त्रिमूर्ती होम अप्लायन्सेस अँड एंटरप्रायझेसमध्ये भव्य दसरा खरेदी महोत्सव सुरू आहे.
खरेदी फक्त त्रिमूर्तीमधूनच’ गृहिणींच्या या खास आग्रहास्तव 51 आटाचक्कीच्या प्रथम खरेदीवर भरघोस व हमखास फायदा मिळवण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वाईच्या महागणपती मंदिरासमोरील यात्री निवास मधील मोझर बंधुचे त्रिमूर्ती’ म्हणजे संसार उपयोगी सर्व साहित्याचे भांडार अशी ओळख असलेल्या मोझर’ शोरूममध्ये तवा-चमचापासून ते गॅस गिझर, मिक्सर, ओव्हन, शेवया मशीन, आर ओ, विविध प्रकारच्या गॅस शेगडी व अन्य विविध गृहपयोगी वस्तूंबरोबर नवीन तंत्रज्ञान, आकर्षक रंग डिझाइन्सच्या व असंख्य व्हरायटीजमधील स्टील आटा चक्की उपलब्ध असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पहिल्या 51 ग्राहकांसाठी 19 हजारांची शंभूराज आटाचक्की फक्त 9999/ रुपयांमध्ये घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. आजच आपली ऑर्डर बुक करा.
पंचवीस वर्षाची यशस्वी परंपरा मोझर त्रिमूर्तीने जपली आहे. जनतेची सेवा म्हणून मोझर त्रिमूर्ती’मध्ये दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर दरवर्षीच ग्राहकांचा मेळा भरवला जातो. दसऱ्यानिमित्त खरेदीचा आनंद घेण्यासाठी एकदा जरुर मोझर त्रिमूर्ती होम अप्लायन्सला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.