लोणी काळभर (पुणे)- पुणे शहरासह जिल्ह्याला बुधवारी (दि. 14) जोरदार पावसाने तडाखा दिला. दरम्यान, या पावसामुळे भिगवण (ता. इंदापूर) जवळ उजनी धरण्याच्या बॅकवॉटर आल्याने पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक उरुळी कांचन, लोणी काळभोर, कवटीपाट (ता. हवेली) टोलनाक्याजवळ रोखली होती. तर भिगवणजवळ काही वाहनेही वाहून गेल्याचे समजते. तर रात्रीसाडेदहाच्या सुमारास उजनीमधून 2 लाख 20 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
निमगाव केतकी गावात पुराच्या वेढ्यात 55 जण अडकले असून त्यातील 40 जणांना सुखरूपपणे बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.तर 15 जण अजूनही अडकून पडले आहेत. इंदापूरजवळ दोनजण वाहनासह वाहून गेले; मात्र वेळीच मदत मिळाल्याने ते बचावले आहेत. ही माहिती बारामतीच्या उपविभागीय अधिकार्यांनी दिली.
डाळजजवळ भिगवण ते इंदापूर या दरम्यान महामार्गावर पाणी वाहात असल्याने तब्बल एक ते दोन तास वाहतूक रोखली होती. तर वीर धरणातून पाणी सोडल्याने व दमदार पाऊस कोसळल्याने उजनीची पाणीपातळी वाढली. बॅकवॉटर महामार्गावर आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली होती.