आबुधाबी – कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन याच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत किंग्ज इलेव्हन पंजाबने तक्रार केली आहे. याची गंभीर दखल घेत बीसीसीआयच्या समितीने त्याला तंबीही दिली असून पुन्हा अशी तक्रार आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
पंजाबचा आत्मघात, कोलकाताचा अशक्यप्राय विजय
पंजाबविरुद्धचा सामना कोलकाताने केवळ 2 धावांनी जिंकला होता. या सामन्यात नरेननेच अखेरचे षटक टाकले होते. सामना संपल्यावर पंच ख्रिस ग्रेफनी व उल्हास गंधे या पंचांनी नरेनची शैली वादग्रस्त असल्याची तक्रार नोंदवली होती.