मुंबई – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने आणि ते अधिक खोलवर गेल्याने त्याची दिशा पश्चिम-वायव्य अशी राहणार आहे.
त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भासह कोंकणातील बऱ्याच ठिकाणी येत्या चार पाच दिवसता मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूते यांनी दिली आहे.
येणारा आठवडा,11-17 Oct, महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाउस पूर्णता सक्रीय राहण्याची शक्यता.काही ठीकाणी मुसळधार ते अतीमुसळधारची शक्यता,गडगडाटासह 🌩 जोरदार वारे.कापणीला आलेल्या पीकांवरती दाट प्रभाव होण्याची शक्यता.
IMD च्या इशा-यांकडे कृपया लक्ष द्यावे.TC@RMC_Mumbai
@RMC_Nagpur pic.twitter.com/i4mcAuWNxV— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 11, 2020
मुंबईच्या हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर म्हणाले की, पुढील आठवड्यात 11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात कोकणासह इतरही ठिकाणी पाऊस सक्रीय राहण्याची शक्यता आहे. तसेच ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव होण्याची शक्यता आहे. असे होसाळीकर म्हणाले.