मुंबई – टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेले असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.
रिपब्लिकच्या 4 वरिष्ठ पदावरील व्यक्तींना हे समन्स जारी करण्यात आले आहेत. यात हंसा रिसर्च ग्रुपच्या दोघांना गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. गुन्हे शाखा उद्या (शनिवारी) आणखी 6 जणांची चौकशी करणार आहे.
विकास खानचंदानी (सीईओ रिपब्लिक), हर्ष भंडारी (सीओओ रिपब्लिक), प्रिया मुखर्जी (सीओओ रिपब्लिक) आणि घनश्याम सिंग (डिस्ट्रीब्युशन हेड ऑफ रिपब्लिक) यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे.