पुणे – शहरात रस्त्यावरील वाटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शस्त्राचा धाक दाखवून किमती ऐवज आणि रोकड लुटण्याचे प्रकार घडतात.
मात्र, त्यांच्याकडून धाक दाखवून चक्क “गुगल पे’वर पैसे ट्रान्सफर करून घेण्याची घटना प्रथमच घडली. ही घटना धायरी येथे काही दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी केतन श्रीकृष्ण पाटील (32, रा. धायरी) हे रात्री कारमधून त्यांच्या मित्राकडे जात होते. यावेळी त्यांना डीएसके विश्व ते नांदेड फाटा रस्त्यावर तिघांनी अडवले.
त्यांनी रस्त्यामध्ये दुचाकी आडवी लावली होती. त्यांनी केतन यांच्या गाडीची चावी काढून घेऊन गाडी फोडण्याची धमकी दिली. यानंतर त्यांना “गुगल पे’द्वारे 3 हजार रुपये वर्ग करण्यास सांगितले. यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.