आबूधाबी – सलामीवीर राहुल त्रिपाठीच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताने चेन्नईसमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर कोलकाताने 20 षटकांत सर्वबाद 167 धावसंख्येपर्यत मजल मारली.
Let’s do this, Knights! 💪#KKRvCSK #KKRHaiTaiyaar #Dream11IPL pic.twitter.com/qBFXBrSZdz
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 7, 2020
कोलकाताच्या प्रमुख फलंदाजांनी आज निराशा केली. कोलकाता संघाचा राहुल त्रिपाठी वगळता इतर एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्रिपाठीने प्रथमच मिळालेल्या संधीचे सोने केले आणि संघाची एक बाजू धरून ठेवत सुस्थितीत पोहोचवले. त्रिपाठीने 51 चेंडूत (8 चौकार व 3 षटकार) 81 धावंची खेळी केली. याव्यतिरिक्त शुभमन गिल (11), दिनेश कार्तिक (12) सुनील नरेन (17) आणि पॅट कमिन्स (17) या फलंदाजानांच दुहेरी धावसंख्या काढता आली. नितीश राणा (09), इयोन माॅर्गन (07), आंद्रे रसेल (02) स्वस्तात बाद झाले. कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी शून्यावर माघारी परतले.
चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने 4 षटकात 37 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर सॅम करन(4 षटक 26 धावा), शार्दुल ठाकूर (4 षटक 28 धावा) आणि कर्ण शर्मा (4 षटक 25 धावा) यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दीपक चहरला एकही गडी बाद करता आला नाही आणि तो महागडा गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकांत 47 धावा दिल्या.