सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून बुधवारी संध्याकाळपर्यंत 385 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 778 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 60, कराड 26, फलटण उपजिल्हा रुग्णालय 65, कोरेगाव 52, वाई 55, खंडाळा 76, रायगाव 96, पानमळेवाडी 97, मायणी 6, महाबळेश्वर 25, दहिवडी 60, खावली 14, तळमावले 28, म्हसवड 19, पिंपोडा 19 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 80 अशा एकूण 778 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.