नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडीत महिलेचा आज दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मध्यरात्रीच पोलिसांनी जबरदस्तीने पीडितेवर अंत्यसंस्कार केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना पीडितेच्या भावाने म्हंटले कि, अखेरचा एकदा तिचा मृतदेह घरी आणला जावा यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण पोलिसांनी ऐकले नाही. माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असे दिसत आहे. पोलिसही आम्हाला काहीच माहिती देत नाहीत, असे त्यांनी सांगितले.
We’d told Police that we’ll perform funeral in morning. But they were in haste & were forcing us to do it immediately. They said it has been 24 hrs and body is decomposing. We wanted to do it in morning as more relatives would’ve come by then: Brother of #Hathras gangrape victim pic.twitter.com/zu5llvsj8N
— ANI UP (@ANINewsUP) September 30, 2020
पीडितेच्या मृतदेह रात्री १० वाजता रुग्णालयातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी पीडितेच्या भावाचा आरोप फेटाळला आहे. शांती व सुव्यवस्थेसाठी आणि कुटुंबियांसोबत मध्यरात्री अंत्यसंसकार करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
‼️खण्डन/Denial‼️
➡️ कतिपय सोशल मीडिया के माध्यम से यह असत्य खबर सार्वजनिक रुप से फैलायी जा रही है कि “थाना चन्दपा क्षेत्रान्तर्गत दुर्भाग्यपूर्ण घटित घटना में मृतिका की जीभ काटी गयी, आँख फोडी गयी तथा रीढ की हड्डी तोड दी गयी थी
हाथरस पुलिस इस असत्य एवं भ्रामक खबर का खंडन करती है pic.twitter.com/tyBTi1xZhp— HATHRAS POLICE (@hathraspolice) September 29, 2020
याआधी पीडित तरुणीच्या वडील आणि भावाकडून रुग्णालयाबाहेर निदर्शन करण्यात आले. परवानगी न घेताच मृतदेह नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्यासोबत काँग्रेस तसेच भीम आर्मीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
दरम्यान, पीडित तरुणी 4 सप्टेंबरला हाथरसमधील शेतातून बेपत्ता झाली होती. काही कालावधीनंतर ती गंभीर जखमी अवस्थेत सापडली होती. आरोपींनी तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिची जीभ चावली गेल्याने जीभ तुटली होती. तिच्या हात-पायांना अर्धांगवायूही झाला होता. तिला अलिगडमधील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते.