भारतीय प्रीमियर लीग 2020 या पर्वातील दहावा आज (28 सप्टेंबर) होत आहे. हा सामना मुंबई इंडियन्स अणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाविरुद्ध असणार आहे. सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम दुबई येथे होणार आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील या दोन्ही संघाचे प्रत्येकी दोन सामने झालेत. दोन्ही संघांना एक पराभव एका विजयाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्स संघाला चेन्नईने सलामीच्या सामन्यात पराभव केला आहे,तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला पंजाब संघाविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे दोन्ही संघाला दुसर्या विजयाची प्रतीक्षा लागली आहे.
आतापर्यंत मुंबई अणि बेंगळुरू संघात 27 सामने खेळले गेले आहे. त्यामधे 18 सामन्यात मुंबईने अणि 9 सामन्यात बेंगळुरूने विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबई संघाचं पारडे जड राहील. त्याबरोबर दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर या मोसमातील चार सामने खेळवले गेले आहेत. चार ही सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्या संघाने विजय मिळविला आहे. त्याचबरोबर चारपैकी तीन सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर संघ पराभूत झाला आहे. फक्त चेन्नई संघाने मुंबई विरुद्ध नाणेफेक जिंकून सामना ही जिंकला होता. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार आहे.
मुंबई इंडियन्स संभाव्य संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या, कुणाल पंड्या, नॅथन कुलटर नाईल,ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, राहुल चहर.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संभाव्य संघ :
पार्थिव पटेल, विराट कोहली(कप्तान), एबी डिविलियर्स, मोइन अली, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, एबी डिविलियर्स, उमेश यादव, डेल स्टेन, नवदीप सैनी, देवदत्त पडीकल.