#IPL2020 : मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला

दुबई  – आयपीएल स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्यात महत्त्वपूर्ण सामना रंगणार आहे. यंदाच्या स्पर्धेतही कर्णधार विराट कोहलीच्या बेंगळुरू संघाला मुंबई विरुद्धच्या लढतीत प्रतिष्ठा उंचावण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई विरूध्द बेंगळुरू महत्त्वपूर्ण सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्सच्या बाजूनं लागला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षण स्विकारताना रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

दरम्यान, यंदाच्या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघावर विजय मिळवल्यावर थाटात सुरुवात केलेल्या बेंगळुरूला पुढील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून हार पत्करावी लागली. या दोन्ही सामन्यात कर्णधार कोहली साफ अपयशी ठरला. त्याने पहिल्या सामन्यात 14 तर त्यानंतरच्या सामन्यात केवळ 1 धाव केली.

दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ सातत्याने सरस कामगिरी करत आहे. चेन्नईकडून सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरीही त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत आपल्या चुका दुरुस्त करण्यात यश मिळवले. दोन्ही संघांची तुलना केली तर कागदावर ते एकमेकांसाठी तुल्यबळ वाटत असले तरीही कोहलीचा संघ कागदी वाघ ठरत आहे. तर, रोहितचा संघ प्रगती करत आहे.

मुंबई अंतिम 11 संघ – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड, क्रुनाल पांड्या, राहुल चाहर, जेम्स पैटिनसन, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

बेंगळुरू अंतिम 11 संघ : देवदत्त पडिक्कल, आरोन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स (यष्टीरक्षक), गुरकीरत सिंह मान, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, एडम ज़म्पा, इसुरु उदाना.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.