बारामती : मराठा समाजाबरोबर आता धनगर समाज देखील आक्रमक झाला आहे. आज बारामतीत सकल धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बारामतीतील निवास्थान असलेल्या गोविंद बागेसमोर ‘ढोल बजाव-सरकार जगाओ’ आंदोलन करण्यात आलं.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1339470223059346/
धनगर आरक्षण प्रश्न राज्यभर गाजत असून आदिवासी समाजाला दिले जाणारे आरक्षणाचे सर्व लाभ द्यावेत. धनगर समाजालाही एसटी( ST) प्रवर्गात समाविष्ट करून धनगर समाजाला आरक्षण द्यावे. त्याचबरोबर याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करून धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा येत्या काही दिवसात धनगर समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा बारामती धनगर समाजाचे नेते पांडुरंग कचरे यांनी दिला आहे.