मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ‘ड्रग्ज प्रकरण’ सध्या चांगलचे गाजत आहे. या प्रकरणी बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.
यात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यामध्ये झालेल्या चॅट संबंधी महत्त्वाचे खुलासे एनसीबी चौकशीत समोर आले आहेत. यामुळे दीपिकाच्या अडचणींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने करिश्माची 6 तास चौकशी केली. या चौकशीत करिश्माने त्या व्हाट्सऍप ग्रुप प्रकरणी माहिती दिली. या ग्रुपमध्ये फक्त तीन जणांचा समावेश होता. ज्यांचे नाव जया, करिश्मा आणि दीपिका असे आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रुपची ऍडमीन दीपिका होती.
या ग्रुपमध्ये मुख्यतः ड्रग्सवरून चॅट होत असे. व्हायरल झालेल्या चॅटमध्ये 2017 साली दीपिकाने हशिश नावाच्या ड्रग्सची मागणी केल्याची कबुली देखील करिश्माने दिल्याचे समजते.
दरम्यान, एनसीबीकडून रकुलची पाच तास चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान आपण कधीही ड्रग्स न घेतल्याचा दावा रकुलने केला आहे.