नवी दिल्ली – चीनी गुप्तचरांना संरक्षण विषयक संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल एका मुक्त पत्रकाराला आणि त्याच्या नेपाळी सहकाऱ्याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी हा पत्रकार चीनी गुप्तचर 2016 ते18 या काळात चीनला गोपनीय माहिती देत असल्याचे सांगितले.
पत्रकार राजीव शर्मा हा संवेदनशील संरक्षण विषयक आणि सामरिक धोरणांची माहिती चीनी गुप्तचरांना देत होता. 2016 ते 18 या काळात अन्य देशांत तो यासाठी त्यांची गाठभेट घेत होता, असे दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त संजीव कुमार यादव यांनी सांगितले.
त्याचे दोन साथीदार – एक चीनी महिला आणि नेपाळी पुरूष यांची महिपालपूर भागात एक कंपनी होती. त्याद्वारे ते चीनला औषधे निर्यात करत असत. चीनमधून आलेले पैसे येथील हस्तकांना देत असत. गेल्या वर्षभरात याचे सुमारे 40 ते 45 लाखांचे व्यवहार झाले आहेत, असेही यादव यांनी सांगितले.
शर्मा हा 40 वर्ष पत्रकारितेत असून तो ग्लोबल टाईम्स या वर्तमानपत्रासाठी स्तंभलेखन करत असे. त्याला या चीनी महिलेने मोठी रक्कम दिलीअसल्याची शक्यता आहे.