पालिका प्रशासनाचा विचार
पुणे – वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यात आता मुंबईप्रमाणे चलनवलनावर निर्बंध लागू करण्याचा विचार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी सांगितले. याविषयी शुक्रवारी बैठक होणार असून, पालकमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी नमूद केले.
करोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासन आणि अन्य संस्था गेल्या पाच महिन्यांपासून जीव तोडून कामाला लागली आहे. यासाठी कडक लॉकडाऊनपासून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, बहुतांश नागरिक ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. याची परिणती रुग्णसंख्या वाढण्यात होत आहे. आता यालाच पुन्हा एकदा अटकाव करण्यासाठी पालिकेने जमावबंदी लागू करण्याचा विचार करत आहे, असे आयुक्त कुमार म्हणाले.
होम क्वारंटाइन नागरिकांवर नजर
होम क्वारंटाइन नागरिकांच्या हातावर न पुसले जाणारे शिक्के मारणे, घरावर स्टिकर लावता येईल का, याबाबत निर्णय घेऊ, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.