नगर – लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले. या संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी प्रधानमंत्री पथ विक्रेता, आत्मनिर्भर स्वनिधी योजना अंमलात आणून प्रत्येक पथविक्रेत्याला 10 हजार रुपयांचे कर्जरुपी आर्थिक मदत करुन व्यवसाय पुन्हा सुरु करता येइल.
तसेच या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पथविक्रेता डिजिटल बॅकिंग करण्याकडे वळावे, यासाठी अनुदान देण्यात आली आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांची डिजिटल बॅकिंगमुळे समाजात आपली पत निर्माण होइल, असे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले.
भिंगार शहर भाजप व महिला आघाडीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री पथविक्रेता, आत्मनिर्भर स्वनिधी योजना केंद्राचे उद्घाटन भाजप शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, शहराध्यक्ष वसंत राठोड, शिवाज दहिहांडे, नगरसेविका शुभांगी साठे, महिलाध्यक्षा ज्योत्सना मुंगी, युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर कटोरे, गणेश साठे, संतोष हजारे, अनंत रासणे, अनंत बोथरा, वैशाली कटोरे, महेश नामदे, राकेश भाकरे, तुषार पोटे, उमेश साठे, सौरभ रासणे, सुरेश तनपुरे, महाराष्ट्र बॅंकेच्या विनिता शिखर आदी उपस्थित होते.