अवयवदान चळवळीला चालना देण्याची गरज : शेंडे महाराज

नगर – फिनिक्‍स फाउंडेशनचे सुरु असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असून, या शिबीराद्वारे गोरगरीबांची सेवा घडत आहे. देशात अवयवदान चळवळीला चालना देण्याची गरज असून, फिनिक्‍सने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. त्यांच्यामुळे अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान घडले असून, अंधांना नवदृष्टी मिळाली आहे. छोट्याश्‍या गावातून सुरु झालेली ही रुग्णसेवेचा वटवृक्ष बहरला असून, सर्वसामान्यांना याचा आधार मिळत असल्याचे प्रतिपादन शेंडे महाराज यांनी केले.

नागरदेवळे येथे फिनिक्‍स सोशल फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरात सहभागी झालेल्या वारकरी संप्रदायातील 47 महाराजांनी नेत्रदानाचा संकल्प केला असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली. एका व्यक्तीने योग्य वेळेत मरणोत्तर देहदान केल्यास त्याच्या विविध अवयवाच्या माध्यमातून 7 व्यक्तींना जीवदान मिळू शकतो.

अंधश्रध्देमुळे अनेक नागरिक देहदान करण्यास पुढे येत नसून, वारकरी संप्रदायातील महाराजांनी अवयवदान चळवळीबाबत समाजात जागृती करण्याचे त्यांनी आवाहन केले.

या शिबीरात नेत्रतपासणी बरोबरच ज्येष्ठ नागरिकांचे मधुमेह व रक्तदाबाची तपासणी देखील करण्यात आली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी गौरव बोरुडे, डॉ. राहुल बोडखे, मिश्रीलाल पटवा, सौरभ बोरुडे, बाबासाहेब धिवर आदिंसह फिनिक्‍सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.