भोर-अखिल भारतीय मराठा महासंघाच्या भोर तालुका युवती उपाध्यक्ष पदी पोम्बर्डी (ता. भोर) येथील कु. दिशा ज्ञानेश्वर खोपडे हिची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे भोर तालुका अध्यक्ष मा. श्री. सुशांत थोपटे यांनी निवडीचे पत्र प्रदान केले. यावेळी मराठा महासंघाचे भोर तालुका युवक अध्यक्ष भूषण खोपडे, सरचिटणीस प्रसाद गाडे, कोषाध्यक्ष दत्तात्रय घोलप तसेच पोम्बर्डी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, महिला – युवती व जय हनुमान तरुण मंडळ पोम्बर्डी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा महासंघाच्या माध्यमातुन मराठा समाज्यातील युवतींना येणाऱ्या अडीअडचणी, युवती व्यवसाय व नोकरी मेळावा, महिला व युवती सबलीकरण अशा अनेक उपक्रमांचे आयोजन मराठा महासंघाच्या माध्यमातुन समाज्यात राबविणार असल्याचे निवडीनंतर सांगितले.
त्याच बरोबर तालुक्यातील मराठा समाज्यातील प्रामुख्याने कुणबी दाखले, मराठा आरक्षण, शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्याचे काम चालू असल्याचे तालुका अध्यक्ष सुशांत थोपटे यांनी सांगितले. आगामी काळात गाव तेथे शाखा व गाव तेथे वाचनालय या उपक्रमांमार्फत मराठा महासंघाचे जाळे तालुक्यात पसरवुन मराठा समज्यातील तरुण एकजुट ठेवणार असल्याचे युवक अध्यक्ष भुषण खोपडे यांनी सांगितले.