लहानग्यांना दिला जातोय प्रवेश
जाधववाडी – येथील “डी-मार्ट’मध्ये गर्दी वाढली असून, धोका पत्करून नागरिक आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन येत आहेत. करोनाने डोके वर काढले. आता बाधित रुग्णांची संख्या अद्याप घटलेली नाही. दिवसेंदिवस नवे नवे रुग्ण सापडत असून, ग्रामीण भागातही करोनाचा धोका अधिक वाढला आहे.
शहरात करोनानी कहर केला असून, करोनाबाधितांची संख्या वाढली असताना नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या चिमुकल्यांना आणणे टाळणे गरजेचे असताना असे होताना दिसत नाही. डी-मार्ट प्रशासनाने यापूर्वी लहानग्यांना आत नेण्यास बंदी घातली होती; परंतु ती बंदी आता उठविण्यात आली असून, सर्रासपणे काही नागरिक चिमुकल्यांच्या तोंडाला मास्क न लावता आत येत आहेत, हे सध्या परवडणारे नाही.
प्रशासन करोना आटोक्यात आणण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना नागरिकांमध्ये प्रशासनाकडून अजूनही जागरूकतेची आवश्यकता आहे. शहरात भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टी, मोहननगर येथील रामनगर विद्यानगर जो दिवसांपूर्वी करोनाचा “हॉटस्पॉट’ ओळखला जात होता, अशा झोपडपट्टी परिसरात व काही सार्वजनिक ठिकाणी नागरिक विनामास्क वावरताना दिसत आहेत.