अभिनेता विद्युत जामवानने आपल्या ऍक्शन आणि स्टंटमुळे बॉलीवूडमध्ये आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याचा नुकताच “खुदा हाफिज’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यामुळे आता या चित्रपटाच्या सिक्वल साकारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
फारूक कबीर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विद्युत जामवान आणि शिवालिका ओबेरॉय यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या सिक्वलची निर्मात्यांनी घोषणा केली असून “खुदा हाफिज चॅप्टर-2′ असे चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा विद्युतला शानदार ऍक्शन सीन्स करताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
या सिक्वलमध्ये विद्युत आणि शिवालिकाची पुढील लव स्टोरी दाखविण्यात येणार आहे. ज्यात भरपूर ऍक्शन सीन्स असणार आहेत. या अनू कपूर, शिव पंडित आणि अहाना कुमरा आदी कलाकारही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू करण्यात येणार आहे.