…तर जमीन मोबदला देण्याचा वेग वाढणार

पुणे – दौंडज व पिंपरे खुर्द येथे पालखी मार्गाकरिता संपादित होणाऱ्या जमिनीच्या नुकसानभरपाई वाटप करण्यासंदर्भात शिबिर घेऊन लागणाऱ्या कागदपत्रांबाबत सविस्तर मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांच्याकडून करण्यात आले.

पुणे-मुंबईत राहणारे खातेदार यांचे संमतीपत्र तसेच बॅंक खात्याचा तपशील सादर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. याबाबतची माहिती 8-10 दिवसांत संबंधित खातेदार सादर करणार असल्याने नजीकच्या भविष्यात नुकसानभरपाई वाटपाचा वेग निश्‍चितपणे वाढणार असल्याचे गाढे यांनी सांगितले.

यावेळी गावातील नागरिकांच्या अनेक प्रश्‍नांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी काही शेतकऱ्यांच्या न्यायालयात केसेस सुरू असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले, त्याबाबत चर्चा करून त्याविषयी फेरविचार करून शक्‍य असल्यास नुकसानभरपाई स्वीकारण्याच्या विषयाबाबत पक्षकारांची आपसात तडजोड करता येणे शक्‍य असल्यास त्या पर्यायाचा विचार करण्याचे आवाहन केले. तसेच अजून काही ठिकाणी आजोबा मयत झाले असले तरी सात-बाराला मात्र अजून त्यांचीच नावे आहेत.

पुढील वारसांची नावे लागलेली दिसत नाही, असे एक प्रकरण पिंपरे खुर्द येथे आढळल्याने याबाबत तातडीने दाखल घेऊन स्थानिक तलाठी व मंडल अधिकारी यांना तातडीने आवश्‍यक त्या कार्यवाहीच्या उपजिल्हाधिकारी गाढे यांनी सूचना दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.