पुणे – जिल्हा नियोजन समितीकडून आत्तापर्यंत ससून रुग्णालयातील अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य, औषधे खरेदीसाठी 2 कोटी 49 लाख 77 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. औंध जिल्हा रुग्णालयात रॅपीड ऍन्टिजेन टेस्ट कीट, ऑक्सिजन मशीन, औषधे, आयसोलिशन, ऑक्सिजन पाइपलाइन यासाठी 46 कोटी 17 लाख 1 हजार रुपये दिले आहेत.
तर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी 2 कोटी 26 लाख, खडकी कॅन्टोन्मेंटसाठी 2 कोटी 26 लाख 79 हजार, बारामती शासकीय महाविद्यलाय 1 कोटी 40 लाख 53 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर देहू कॅन्टोन्मेटमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची आवश्यकता असून त्यासाठी प्रस्ताव मागविला आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे यांनी दिली.