मागील २४ तासात ९२ पाॅझेटिव्ह; तिघांचा मृत्यू
राजगुरूनगर – खेड तालुक्यात करोना विषाणू संसर्ग वाढतच आहे. मागील २४ तासात नव्याने ९२ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत बाधित व्यक्तींची संख्या ३३४६ झाली आहे तर मृत्यूची संख्या ७९ वर गेली आहे.
मागील २४ तासात तालुक्यात तालुक्यात चऱ्होली येथे ७५ वर्षीय व्यक्तीचा, चाकण नगर परिषद हद्दीत ६४ वर्षीय व्यक्तीचा तर तुकाई भांबुरवाडी येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा करोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तालुक्यात मागील २४ तासात राजगुरूनगर १९, चाकण ९,आळंदी ८ या तीन नगर परिषदांमिळून ३६ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील बिरदवडी (१), चिंबळी (५), खराबवाडी (६), कुरुळी (३), म्हाळुंगे (२),मेदनकरवाडी (४), नाणेकरवाडी (५), निघोजे (१),वाकी खुर्द (१), खालूंब्रे (२), बहुळ (३), भोसे (९), चऱ्होली खुर्द (१), कोयाळी (३), मरकळ (१), रासे (१),शेलपिंपळ्गाव (४), सोळू (२), चांडोली (१), तुकई भांबुरवाडी (१) या२० गावात एकूण ५६ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
तालुक्यातील ३३४६ करोना बाधित व्यक्तींपैकी २५९९ व्यक्ती उपचारानंतर बऱ्या झाल्या असून ६६८ व्यक्तींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.