मेक्सिको सिटी – जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वच देशांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर ही ताण आला आहे. मेक्सिकोमध्येही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने आता करोनाच्या रुग्णांची देखभाल करण्याचे काम यंत्रमानव यांना देण्यात आले आहे.
मेक्सिको सिटी मधील एका रुग्णालयात तैनात करण्यात आलेल्या या यंत्रमानवाचे नाव रोबोटीना असे असून हा रोबो फक्त रुग्णांची देखभाल करतो असे नव्हे तर इतरही अनेक काम करत असल्याने तो त्याच्या या अष्टपैलू कामगिरीने रा रुग्णालयाचा अविभाज्य भाग बनला आहे
या रोबोला खाली चाके लावण्यात आली असून त्याच्या चेहऱ्यावर एक कॅमेराही फीट करण्यात आला आहे तो या रुग्णालयातील सर्व वार्ड्समध्ये फिरत राहतो डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये संवाद ठेवण्याचे काम हा रोबो अतिशय कार्यक्षमतेने करत आहे.
या रोबोवर एक डिस्प्ले बोर्ड असून त्याच्या माध्यमातून रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात हा रोबो आसपास असल्याने रुग्णांना पण या आजारातुन बरे होण्याचा विश्वास वाटत असून त्यांच्यातील सकारात्मता वाढत आहे हा रोबो रुग्णांचे अनेक प्रकारे मनोरंजन करण्यासही प्राधान्य देत असल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे
अर्थात केवळ मेक्सिकोच नव्हे तर भारतातही करोना रुग्णांवरील उपचारासाठी रोबोटचे तंत्रज्ञान वापरण्याचा विचार सुरू झाला आहे दिल्लीतील एम्स रुग्णालयात काही दिवसापूर्वी अशा रोबोटची चाचणी घेण्यात आली होती भारतात रोबोट बनवणाऱ्या मिलग्रो कंपनीचे राजीव करवाल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी सर्वच ठिकाणी रोबोटचा अतिशय चांगला आणि कार्यक्षम वापर होऊ शकतो