सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 218 रुग्णांना दहा दिवसांनतर मंगळवारी घरी सोडण्यात आले. तर 864 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील 47, खंडाळा तालुक्यातील 19, खटाव तालुक्यातील 13, कोरेगाव तालुक्यातील 8, माण तालुक्यातील 9, पाटण तालुक्यातील 24, फलटण तालुक्यातील 1, सातारा तालुक्यातील 55, वाई तालुक्यातील 42 अशा एकूण 218 जणांचा समावेश आहे.