बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्ता अनेक महिन्यांनी लॉकडाऊननंतर सेटवर परतल्याने खूप उत्साहित आहे. आपल्या आगामी ‘बेलबॉटम’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती सध्या ब्रिटनला गेली आहे. यावेळी तिच्यासह अक्षय कुमार, वाणी कपूर आणि हुमा कुरैशी सेटवर दाखल झाले आहेत.
लारा दत्ताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती आपल्या टीम मेंबर्ससोबत मेकअप करताना दिसत आहे. सध्या करोना संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्वजण मास्क घातलेले दिसत आहेत.
View this post on Instagram
#challengeaccepted @diamirzaofficial @farahkhanali @suchipillai @vinaahuja @crystalfernandespereira
हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, नव्याने प्रवास सुरू झाला आहे. मी अशा मुलींसाठी दावा करत आहे, ज्या 42 वर्षीय एका अभिनेत्रीच्या रूपात करोना काळात बॉलीवूडमधील सेटवर परतल्याने अद्भूत असे वाटत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून लाराच्या चाहत्यांनी तिला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, शूटिंगप्रसंगी सेटवर सुरक्षित वातावरण असल्याने तिने निर्मात्यांचे आभार मानले आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शेड्यूलनुसार काही दिवसांपूर्वीच सर्व कलाकार ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणीचे चित्रिकरण पूर्ण करून सर्वजण परत मायदेशी परतणार आहेत.