बॉलीवूडमधील अभिनेता ईशान खट्टरने अल्प काळातच आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. बॉलीवूडमधील आतापर्यंतच्या प्रवासात त्याने केलेल्या वाटचालीवर तो आनंदी आहे.
ईशानने दिग्दर्शक माजिदी माजिद यांच्या “बियॉन्ड द क्लाउड्स’ या इराणी चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. मराठीमधील लोकप्रिय “सैराट’ चित्रपटाच्या हिंदी रिमेक “धडक’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. तसेच तो काही दिवसांपूर्वीच विक्रम सेठ यांच्या कादंबरीवर आधारित “अ सुटेबल बॉय’ या मिनी सीरिजमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री तब्बूसोबत झळकला होता.
आपल्या करियर ग्राफबाबत ईशान म्हणाला, मला मिळालेल्या प्रत्येक संधीमुळे मी आनंदी आहे. माझे येणारे आगामी चित्रपटही असेच आहेत, ज्यात मला सहभागी करण्यात आल्याने मला एक वेगळाच अनुभव मिळत आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, ईशान लवकरच हॉरर कॉमेडी “फोन भूत’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि सिद्धार्थ चतुवेर्दी हे मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय “पिप्पा’ चित्रपटात तो ब्रिगेडियर बलराम सिंह मेहताची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट राजा कृष्ण मेनन हे दिग्दर्शित करणार आहेत.