पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहर देशात 15 व्या क्रमांकावर आले आहे. मागील वर्षी शहराचा क्रमांक 37 वा होता. केंद्र शासनाकडून या स्पर्धेचा निकाल जाहीर केला असून सलग चौथ्या वर्षी इंदोर शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबई महापालिका यावर्षी तिसऱ्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर पुणे शहर मागील वर्षी राज्यात 8 व्या क्रमांकावर होते ते यंदा चौथ्या क्रमांकावर आहे.