पिंपरी – वडिलांनी त्यांच्या मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून त्या मजुराच्या घरात घुसून मुलावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. तसेच घरातील साहित्याचीही तोडफोड कली. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री पावणेदहा वाजता निगडी-भोसरी रोडवर पत्रा शेड, दुर्गानगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
तौसीफ मेहबूब अतनुर (वय 18, रा. दुर्गानगर झोपडपट्टी, निगडी-भोसरी रोड, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 17) याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल सरोदे (वय अंदाजे 40), मयूर अनिल सरोदे (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी), गौरव अनिल सरोदे (वय 19), शफीक मोदिन शेख (वय 21, रा. मोरेवस्ती, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. निगडी पोलिसांनी आरोपी मयूर आणि शफीक या दोघांना अटक केली आहे.
फिर्यादी तौसीफ यांचे वडील मेहबूब अतनूर हे आरोपींकडे कामाला होते. त्यांनी त्यांच्या मजुरीचे पैसे मागितल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून कोयता आणि तलवारीने तौसीफ यांच्यावर वार केले.