बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याने फोर्ब्स-2020च्या टॉप-10 यादीत स्थान मिळवले आहे. सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये तो बॉलीवूडमधील एकमेव अभिनेता आहे. अक्षयने या यादीत सहावे स्थान मिळविले आहे; परंतु गतवर्षीपेक्षा त्याचे रॅकिंग दोन स्थानांनी घसरले आहे. 2019 मध्ये तो चौथ्या स्थानी होता.
फोर्ब्स पत्रिकेच्या या यादीत हॉलीवूड स्टार ड्वेन जॉन्सन सलग दुसऱ्या वर्षीही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 8.75 कोटी डॉलरची कमाई केली आहे. अक्षय हा एका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी आपल्या पहिल्या टेलिव्हिजन सीरीज “द एंड’वर सध्या काम करत आहे. त्याने अधिकाधिक कमाई ही एंडोर्समेंट डिलमधून केलेली आहे.
फोर्ब्स पत्रिकाने म्हटले आहे की, अक्षयकुमारला आगामी टेलिव्हिजन सिरीजच्या भूमिकेसाठी एक कोटी डॉलर मिळत आहे. दरम्यान, अक्षयकुमार अनेक चित्रपटांत व्यस्त असून “बच्चन पांडे’, “बेलबॉटम’, “लक्ष्मी बॉम्ब’, “सूर्यवंशी’, “पृथ्वीराज’, “अतरंगी रे’ आणि “रक्षा बंधन’ या चित्रपटात तो झळकणार आहे.