नवी दिल्ली – आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या अनेक साधनांचा वापर माणसाकडून केला जातोय, मोबाईल फोन हे त्यापैकीच एक… आज हे साधन प्रत्येकाची गरज बनलं आहे. दरम्यान, तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्ट मोबाइल घेण्याच्या विचारात असाल तर खालील बातमी नक्की वाचा…
नामांकित मोबाईल कंपनी ‘मोटोरोला’ येत्या काही दिवसांतच आपला नवीन स्मार्टफोन Moto E7 Plus लाँच करण्याची शक्यता आहे. मोबाईल युजर्ससाठी Moto E7 Plus फोनमध्ये काही दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. गेल्या महिन्यापासून या फोनचे वैशिष्ट्ये आणि फोटो सोशल मीडियावर लीक होत आहेत.
हे असतील Moto E7 Plus चे खास फीचर्स –
Moto E7 Plus या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 40 प्रोसेसर दिला जाणार आहे. फोन मध्ये 5,000mAh बॅटरी मिळणार आहे. तसेच, Moto E7 Plus मध्ये 48 मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. हा कॅमेरा नाईट व्हर्जन सपोर्ट करणारा असणार आहे.