पिंपरी : सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 10) नव्याने 10 करोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर, करोनामुक्त झालेल्या तिघांना घरी सोडण्यात आले. करोनाबाधित रुग्ण हे सांगवी, वाकड, वारजे माळवाडी, पिंपळे निलख, रहाटणी येथील आहेत.
करोनामुक्त झालेले तीन रुग्ण हे औंध, सांगवी आणि हिंजवडी या परिसरातील आहेत. रुग्णालयात आज पिंपरी-चिंचवड परिसरातील 2 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या रुग्णालयात 52 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 28 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 178 जणांना आत्तापर्यंत उपचार करून घरी सोडले आहे. एकूण 65 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.