वॉशिंग्टन: अमेरिकेत करोनाबाधितांच्या संख्येने 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 50 लाख 36 हजार 881 जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 62 हजार 873 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत शुक्रवारी 58 हजार 611 जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर 69 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले आहे. दररोज सरासरी 60 हजार नवे रुग्ण आढळत असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
50 लाख करोना रूग्णांपैकी 25 लाख 77 हजार 938 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 22 लाख 96 हजार 070 ऍक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 18 हजार 296 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात करोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 5 लाख 32 हजार 107 जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर 9872 जणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 47 हजार 435 जणांना बाधा झाली असून, 32 हजार 811 रुग्ण दगावले आहेत. याशिवाय न्यू जर्सी, टेक्सास, इलिनॉयस आणि फ्लोरिडातही करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.