वॉशिंग्टन: अमेरिकेत नोंदणीकृत झालेल्या चिनी कंपन्यांचे ऑडिट करून नियमभंग करणाऱ्या कंपन्या हुडकून काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची नवी मोहीम आता ट्रम्प प्रशासनाने हाती घेतली आहे.
न्युयॉर्क स्टॉक एक्सजेंच, नॅसडॅक अशा ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या सर्वच चिनी कंपन्यांची आता यानिमित्ताने झाडाझडती घेतली जाणार असून त्याचा मोठा फटका चीनला बसू शकतो, अशी सध्याची स्थिती आहे.
चिनी कंपन्यांच्या ऑडिटर्सना त्यांची ऑडिटची सारी कागदपत्रे अमेरिकन ऑडिट नियायमक मंडळाकडे सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. न्युयॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि नॅसडॅक येथे नोंदणी करण्यासाठी अनेक चिनी कंपन्यांनी अर्ज केले आहेत, त्यांनाही आता या नवीन नियमांचे बंधन घालण्यात आले आहे. त्यांना सन 2022 पर्यंत नोंदणीस अनुमतीच मिळण्याची शक्यता नाही असे सांगण्यात येते.
चीन आणि अमेरिका यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू आहे. त्यातून दोन्ही देश एकमेकांवर अशा कुरघोड्या करीत असले तरी त्याचा मोठा फटका चिनी अर्थकारणाला बसणार आहे.