कराड – कराड-येणपे एसटी बसला येणपे, ता. कराड येथे गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास भरधाव मोटारसायकलची धडक बसल्याने मोटारसायकलवरील अपघातात अविनाश मोहन सुतार (वय 24, रा. येणपे) हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात झाला. असे अपघात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
कराड-येणपे एसटी बस (एमएच-14-यूबी-4058) गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास शेवाळेवाडी-येणपे या अरुंद वळणाच्या व चढ असलेल्या रस्त्यावर आली. त्याच वेळी समोरून कराडच्या दिशेने अविनाश सुतार हा मोटारसायकल (एमजीएच-9987) वरून वेगाने निघाला होता. त्याला समोरून भरधाव आलेली एसटी बस अचानक दिसली. त्यामुळे त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटला आणि एसटीच्या मागील बाजूस मोटारसायकल जोराने धडकली.
या अपघातात अविनाशचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच उंडाळे दूरक्षेत्राच्या सपोनि दीपज्योती पाटील, हवालदार डी. बी. राजे, गणेश बाकले, एस. एस. कोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी एसटी चालक जयसिंग पाटील (वय 45, रा. उंडाळे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अविनाश हा नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाला असल्याने मोटारसायकल वेगाने चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.