नगर -स्वास्थ्यदर्पण प्रतिष्ठान, अहमदनगर संचलित पारनेर तालुक्यातील धोत्रे बु येथील शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालच्या प्रथम वर्ष पदविका तसेच प्रथम वर्ष पदवीचा निकाल नुकताच जाहीर झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
प्रथम वर्ष पदविका परिक्षेत प्रथम वैष्णवी भागवत 93.64 टक्के, द्वितीय – पुनम सुपेकर 92.36 टक्के, तर तृतीय अंकिता गुंजाळ हिने 89.91 टक्के गुण मिळवत अनुक्रमे क्रमांक पटकाविला. प्रथमवर्ष पदवी परिक्षेत प्रथम श्रद्धा कदम 8.69, द्वितीय प्रतिक्षा जाधव 8.68, तृतीय- वृषाली सुरतवाले 8.60 श्रेणींसह अनुक्रमे क्रमांक पटकाविला.
सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या मनिषा झावरे, शैक्षणिक प्रभारी प्रसाद काळे, प्रियांक साबळे, प्रा.प्रविण कर्डक, प्रा.सुयोग देवढे, प्रा.विद्या पवार, प्रा.स्वीटी वाघमारे, प्रा.ऐश्वर्या पडोळे आदिंचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे धोत्रे गावचे सरपंच नंदकुमार भांड, बाबासाहेब सासवडे, संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रशांत शिंदे, डॉ.सुनिल आवारी, सोनाली शिंदे, डॉ. नंदकुमार कुलाळ, सुनिल शिंदे, निलेश शिंदे आदिंसह अनेकांनी अभिनंदन केल