Treasure From World War II Shipwreck : दुसऱ्या महायुद्धात बुडालेल्या जहाजाच्या ढिगाऱ्यातून सापडलेल्या खजिन्यावरील दाव्याबाबतचा खटला दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. युनायटेड किंगडमच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. हा खजिना दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीवर सापडला होता, ज्याचा शोध एका ब्रिटिश एक्सप्लोरेशन कंपनीने लावला होता. हे जहाज एसएस तिलावा होते, ज्याला इंडियन टायटॅनिक असेही म्हटले जाते. ते बुडल्याने, 280 लोक मरण पावले आणि 2000 हून अधिक चांदीचे बार समुद्रात हरवले. या सापडलेल्या खजिन्याची किंमत 360 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
South Africa has won a legal claim over $43 million worth of treasure from a World War II shipwreck that was found off the country’s coast by a British exploration companyhttps://t.co/yv4yX9UlyI
— JenSen Yermi (@agenmossad) May 10, 2024
13 नोव्हेंबर 1942 रोजी, एसएस तिलावा हिंद महासागरात जपानी टॉर्पेडोने बुडवले होते. या जहाजात 900 हून अधिक लोक होते आणि त्यात 2364 चांदीचे बार होते जे तत्कालीन युनियन ऑफ दक्षिण आफ्रिकेने खरेदी केले होते. त्याद्वारे नाणी बनवण्याच्या उद्देशाने युनियनने त्यांची खरेदी केली होती. 2017 पर्यंत या खजिन्यापर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. पण नंतर अर्जेंटम एक्सप्लोरेशन लिमिटेड या ब्रिटीश कंपनीने एक विशेषज्ञ सॅल्व्हेज वाहन आणले ज्याच्या मदतीने खजिन्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले.
#WagnerTonight Science break.
U.K. Supreme Court makes ruling over $43 million in treasure from World War II ship sunk by Japanese torpedoes.https://t.co/WLYgIbg3sW pic.twitter.com/38WWZUtyYT— Firecaptain and Jack (@Firecaptain16) May 10, 2024
यानंतर हा खजिना यूकेला देण्यात आला आणि ती कंपनीची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली. याला दक्षिण आफ्रिकेने विरोध केला होता. कंपनीने कनिष्ठ न्यायालयात युक्तिवाद केला होता की ज्या व्यक्तीला हा खजिना सापडला तो त्याचा असू शकतो. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेने सांगितले की, कनिष्ठ न्यायालयाला कंपनीच्या दाव्यावर सुनावणी करण्याचा अधिकार नाही कारण हा खटला अन्य कोणत्या तरी देशाशी संबंधित आहे. नंतर हे प्रकरण ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला दणका देत दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने निर्णय दिला. आता हा खजिना दक्षिण आफ्रिकेचा झाला आहे.