वॉशिंग्टन – उत्तर-मध्य भारतात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज अमेरिकेतील एका वैज्ञानिक संस्थेने दिला आहे. मान्सूनच्या लो-प्रेशर सिस्टीममध्ये जी घट झाली आहे त्याचा हा परिणाम असेल, असे त्या संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय उपखंडात मान्सून लोप्रेशर सिस्टीमच्या आधारेच पावसाचे प्रमाण निश्चित होत असते. उत्तर आणि मध्य भारतातील पाऊस या घटकावरच प्रामुख्याने अवलंबून असतो.
या घटणाऱ्या मान्सूनच्या त्या भागातील आर्थिक आणि सामाजिक स्तरावरही विपरीत परिणामांची शक्यता असते, असे अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक ऍन्ड ऍटमॉस्फेरीक ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
मान्सूनच्या लोप्रेशर सिस्टीमचा अभ्यास करून पावसाचा अंदाज वर्तवणारी ही नवीन प्रणाली आहे. तथापि, त्याच्या अंतिम निष्कर्षांची अजून नीट तपासणी होण्याची गरजही या अहवालात वर्तवण्यात आली आहे.