नवी दिल्ली – करोना बाधितांना तात्काळ उपचार देण्यासाठी सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालये जीव ओतून सेवा देत आहेत. मात्र, काही हॉस्पिटल बाधितांवर उपचार करून जादा बिल आकारात असून रुग्णांसोबत दुर्व्यवहार करण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशीच एका घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. केवळ ३० रुपये देण्यास जमले नाही म्हणून हॉस्पिटल प्रशासनाने सहा वर्षाच्या चिमुरड्याला स्ट्रेचर ओढण्यास लावले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
देवरिया में स्ट्रेचर को धक्का लगाता यह बालक असल में उत्तर प्रदेश की पंचर पड़ी स्वास्थ्य व्यवस्था को धक्का लगा रहा है।
सरकार को इसे सबक के तौर पर लेना चाहिए और पंचर पड़ी स्वास्थ्य व्यवस्था को नागरिक हितों में तत्काल दुरुस्त करना चाहिए। pic.twitter.com/bIKQoGIABF
— Ajay Kumar Lallu (@AjayLalluINC) July 20, 2020
उत्तरप्रदेशमधील देवरीया जिल्ह्यतील गौरा गावातील छेदी यादव यांची काही दिवसांपूर्वी अज्ञातांसोबत हाणामारी झाली होती. यामध्ये ते जखमी झाले होते. यानंतर त्यांचा देवरीयाच्या सर्जिकल वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
छेदी यादव यांच्यासोबत त्यांची मुलगी बिंदू हॉस्पिटलमध्ये गेली होती. तिथे त्यांना अनेक वेळा ड्रेसिंग करावे लागत होते. मात्र, हॉस्पिटलचे कर्मचारी प्रत्येकवेळी स्ट्रेचरसाठी ३० रुपयांची मागणी करतात. परंतु, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना पैसे देण्यास जमत नव्हते. तेव्हा बिंदुने स्वतः आपल्या सहा वर्षीय मुलासोबत वडिलांना स्ट्रेचरवरून ड्रेसिंग रुमपर्यंत घेऊन गेली.
दरम्यान, देवरीयाच्या जिल्हा हॉस्पिटल प्रशासनाने या घटनेची गंभीर दाखल घेत संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशी घटना कोणाही सोबत घडल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे,