मांडवगण : शिरूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या मांडवगण फराटा येथील ६५ वर्षीय जेष्ठ व्यक्तीचा कोरोना अहवाल पाॕझिटिव्ह आला असल्याची माहीती मांडवगण फराटा केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॕ.मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली.
याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर जेष्ठ व्यक्तीला खोकला,ताप आदींचा ञास होत असल्याने ते येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी गेले होते ,परंतु उपचार घेतल्यानंतरही बरे वाटत नसल्याने त्यांना लोणी काळभोर येथील खाजगी दवाखान्यात पाठविण्यात आले होते.त्यानंतर १८ जुलै रोजी त्यांचा स्वॕब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.
आज दुपारी त्यांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीच्या एकूण ९ जण हे संपर्कात आले असून या सर्वांना होम क्वारटाईन करण्यात आले आहे.तरुणाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे स्वॕब तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून त्यांच्या अजुन किती जण संपर्कात आले आहेत याची माहीती जमा करण्याचे काम सुरु असल्याचे डाॕ.मंजुषा सातपुते-इसवे यांनी सांगितले.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये परंतु त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्यावी
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी या गावात दोन दिवसापुर्वी एका तरुणाचा अहवाल करोना बाधित आल्याने खळबळ उडाली होती. परंतु नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर घरातून बाहेर पडताना मास्क वापर करावा.तसेच दुकानात व अन्य गर्दी च्या ठिकाणी सामाजिक अंतर राखावे, वेळोवेळी साबणाने तसेच सॅनिटायझर ने हात स्वच्छ धुवावे. मास्क घातल्यानंतर योग्य पद्धतीने हाताळावा.ज्यांना करोना सदृश्य लक्षणे जाणवत असतील त्यांनी फारसे घाबरून न जाता वैद्यकीय सल्ला घेऊन तत्काळ उपचार घ्यावे असे आवाहन डॉ. सातपुते- यांनी नागरिकांना केले आहे.