नारायणगाव -भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बदनामकारक फोटो फेसबुकवर टाकून त्यांची बदनामी करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील तीन जणांवर नारायणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 13) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुरेश प्रदीप तांबे, गोपाळ भोजने, अजिंक्य आल्हाट (रा. नारायणगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अय्याज हमीद जमादार (रा कांदळी, नारायणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, आरोपींनी चंद्रकांत पाटील यांच्याविषयी फेसबुकवर योगा दिवसाचे फोटो टाकून त्यावर बदनामीकारक वाक्य टाकून बदनामी केली असल्याने फिर्यादित नमूद केले आहे.