नगर -सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन, महिलेची बदनामी करणाऱ्या एका आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली.
गणेश पांडुरंग गायकवाड (वय 30, रा. सिद्धार्थनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गायकवाड याने 13 एप्रिल रोजी नगर शहरातील एका महिलेच्या नावे फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार केले होते. या अकौंटच्या माध्यमातून त्याने महिलेचा भाऊ व मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून चॅटिंग केली. तसेच महिलेचा तिच्या मैत्रिणीसोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला.
याबाबत महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आरोपीची माहिती घेऊन त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.