फलटण – पाङेगाव, ता. फलटण येथील करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. पाडेगाव येथील दाम्पत्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून त्यातील पतीचा मृत्यू झाला.
पाडेगाव फार्म येथील हे दाम्पत्य पुणे येथे पॉझिटिव्ह आलेल्या त्यांच्या मुलाच्या निकट संपर्कात आले होते. त्यानंतर 62 वर्षांचा पुरुष व 52 वर्षांची महिला यांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली.
यातील पुरुषाला काल (दि. 8) हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, पण तेथे पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा 29 जून ते 1 जुलै या कालावधीत पाडेगाव येथे राहून पुण्याला परत गेला होता. या लोकांच्या निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.