स्वरा भास्करने मामाच्या वेडिंग सेरिमनीजमध्ये आणली रंगत

लॉकडाऊनमुळे सध्या लग्न सोहळ्यात फारशी गर्दी असल्याचे दिसून येत नाही. तसेच हा सोहळा जवळच्या मित्रमंडळी आणि नातलगांच्या उपस्थितीत साजरा करीत आहेत.

दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्या मामाच्या लग्नास हजेरी लावत वेडिंग सेरिमनीजध्ये चांगलीत रंगत आणली. स्वराने तिच्या डान्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

करोना विषाणूमुळे सर्व सिलेब्स सध्या घरीच आहेत. स्वरा भास्करने तिच्या मामाच्या विवाह सोहळ्यामध्ये खूपच रंग भरले. स्वराने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. व्हिडीओमध्ये ती श्रीदेवीच्या “इंग्लिश विंग्लिश’मधील “नवराई माझी’ गाण्यावर नाचताना दिसत आहे.

मेहंदी सोहळा होत असल्याचे तिने कॅप्शनमध्ये सांगितले. तिच्या मामाचे कॉलेजमधील मैत्रिणीशी लग्न होत आहे. घरी मेहंदी आणि ब्राइडल शॉवर फंक्‍शन सुरू आहे. फंक्‍शनमध्ये स्वरा साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

दरम्यान, स्वरा भास्कर बॉलीवूडमधील नेपोटिझमवरील वक्‍तव्यामुळे चर्चेत आली होती. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर विविध चर्चा होत आहे. सुशांतचे चाहते करण जोहर, सलमान खान आणि सोनम कपूर यासारख्या सेलिब्रिटींना ट्रोल करत आहेत. अशा परिस्थितीत स्वराने या सिलेब्सचे समर्थन केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.