पोलीस ‘ऍक्शन मोड’मध्ये : चार दिवसांत अडीच हजार गुन्हे
262 वाहने जप्त
पुणे – बोलून पाहिले…सांगून पाहिले…पण, कोणाचेही न ऐकणाऱ्या काही पुणेकरांना आता “खाकी वर्दी’ने डोस देणे सुरू केले आहे. करोना रोखण्याचे नियम न पाळणे, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी मागील 4 दिवसांत 262 वाहने जप्त केली असून, एकूण अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे शहर, जिल्ह्यात करोना रोखण्यासाठी नागरिकांनी पोलीस तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, त्याउलट नागरिक विनाकारण, बिनधास्त रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे अशा महाभागांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
प्रकरण – गुन्हे संख्या
संचारबंदी काळात फिरणे – 2,432
मास्क न वापरणे- 778
सोशल डिस्टन्सिंग न पाळणे- 3
तीनपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक – 107
वेळेचे बंधन न पळता दुकान सुरू – 45
विनाकारण पायी फिरणे – 901
विनाकारण गाडीवर फिरणे – 336
करोनासंदर्भात नियम मोडल्याप्रकणी मागील चार दिवसांत 2,432 गुन्हे दाखल झाले आहेत. पुणेकरांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे. लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.
– डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे शहर