मंचर -मंचर शहरात आज (दि. 8) तीन रुग्ण सापडले असून, यामध्ये 51 वर्षीय पुरुष आणि 40 वर्षीय एक महिला आणि 23 वर्षीय एक तरुणाचा समावेश आहे, त्यामुळे तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 71 झाली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी बुधवारी (दि. 8) दिली.
या सर्वांनी खासगी दवाखान्यात वैद्यकीय तपासणी केली असून, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर वडगांव काशिंबेग फाटा येथील भीमाशंकर हॉस्पिटल येथे वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. मंचर शहरातील करोनाबाधितांची संख्या सात झाली असून, तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 71 झाली आहे. 48 रुग्ण बरे झाले आहेत. तीन रुग्ण मयत झाले आहेत.
भीमाशंकर हॉस्पिटल येथे 15, पुणे येथे 4, आणि चाकण येथे एका रुग्णावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे आंबेगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले.