मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. बॉलीवूडशी संबंधित बऱ्याच जणांनी या इंडस्ट्रीतील नेपोटिझमला लक्ष्य केले आहे.
सोशल मीडियावर #JusticeForSushantSinghRajput चे हॅशटॅग बऱ्यापैकी ट्रेंड होत आहे.अनेक ट्विटर यूजर्स करण जोहर यांना फिल्म इंडस्ट्रीत नेपोटिझम प्रोत्साहन देण्यासाठी दोष ठरवित आहेत. यातच सोशल मीडियावर आता करण जोहरचा आणखी एक विडिओ वायरल होत आहे.
हा विडिओ शाहिद कपूर व मीरा राजपूतने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोदरम्यानचा आहे. यामध्ये करण मीराला काही प्रश्न विचारण्यापूर्वी ती त्याला थांबवते आणि प्रश्न विचारते. “प्रतिभेला अनुसरून तू या अभिनेत्यांना एक ते पाच या क्रमांकावर ठेव. रणबीर कपूर, रणवीर सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर,” असे पर्याय ती करणला देते. हे पर्याय ऐकून तिच्या बाजूला बसलेला शाहिद तिला विचारतो की यात माझं नाव का नाही? …
शाहिदच्या प्रश्नाचं उत्तर देताना मीरा अप्रत्यक्षरित्या करण जोहरला टोला लगावते. “कारण तो कधीच त्याच्या कोणत्या यादीत तुझं नाव घेत नाही”, असं मीरा म्हणताच करण जोहरच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे होतात. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडियो चांगलाच वायरल होत असून यूजर्स करण जोहर यांना फिल्म इंडस्ट्रीत नेपोटिझम प्रोत्साहन देण्यासाठी दोष ठरवित आहेत.