नगर -कॉंग्रेस पक्ष सर्वात जुना असून, मोठी परंपरा आहे. या पक्षाने देशाच्या जडण-घडणीत मोठे योगदान दिले आहे. या पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य व तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे. पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग हा लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करावे. असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेश समन्वयक शिवाजी जगताप यांनी केले.
शहरातील सामाजिक कार्यकर्तेगणेश ढोबळे यांची नुकतीच महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाच्या नगर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बंटी यादव, नामदेवराव चांदणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, जिल्हा समन्वयक प्रभाकर शेलार, शहर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट, विजय आढाव, चंद्रकांत बागुल, सुभाष तोरणे, नंदू कांबळे, कार्लस साठे आदी उपस्थित होते.
त्याच बरोबर पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावीत. चांगले काम करणार्यांची पक्ष नेहमीच दखल घेत असतो. गणेश ढोबळे यांनी पक्षाच्या कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड करत आहोत, यापुढील काळात ते आणखी चांगले काम करतील व पक्ष संघटना वाढवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ढोबळे म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून आपण सामाजिक कार्यात सक्रिय आहोत. पक्षाने जो विश्वास माझ्यावर टाकला तो निश्चित सार्थ ठरवेल.