नवी दिल्ली, दि. 2 – कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत सातत्याने वाढत आहे. आजमितीस सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 1,32,912 हून अधिक आहेत. कोविड -19 रुग्णांच्या वेळेवरील रुग्णालयीन व्यवस्थापनामुळे दररोज 10,000 हून जास्त रुग्ण बरे होत आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 11,881 कोविड -19 रूग्ण बरे झाले असून त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,59,859 पर्यंत पोहोचली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 59.52% इतका झाला आहे. सध्या 2,26,947 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
चाचणी, रुग्णशोध, उपचार धोरणानुसार, दररोज चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये सातत्याने वाढ झाली असून आजपर्यंत 90 लाखाहून अधिक नमुने तपासले गेले आहेत. गेल्या 24 तासांत 2,29,588 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या, 90,56,173 आहे.
देशातील चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणखी वाढविण्यात आली आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 768 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 297 पर्यंत वाढली आहे यामुळे देशात एकूण 1065 प्रयोगशाळा झाल्या आहेत